पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करणारे हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे आहेत. हा हल्ला रात्री दीड ते दोनच्या सुमारास झाला. ४ ते ५ युवकांनी दुचाकीवर येऊन जाधव यांच्या समर्थ नगर येथील घरावर ही दगडफेक केली. यात दोन ते तीन वाहनांचेही नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरतायेत : राज ठाकरे

दोन दिवसांपूर्वी प्रचारसभेत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला होता. जाधव हे शिवसेनेचे आमदार होते. मराठा आरक्षण आंदोलनावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. जाधव यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. तेथून एमआयएमचे इम्तियाज जलील हे निवडून आले. तेव्हापासून जाधव हे शिवसेनेच्या रडारवर होते. जाधव यांच्यावर संधी मिळेल तेव्हा टीका करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवर जात टीका केली होती. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

PMC बँक घोटाळा: माजी संचालक सुरिंदर अरोरा यांना अटक

दरम्यान, बुधवारी मध्यरात्री ४ ते ५ युवक दुचाकीवर येऊन जाधव यांच्या समर्थ नगर येथील घरावर दगडफेक केली. यावेळी तिथे असलेल्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे युवक जय भवानी, जय शिवराय अशा घोषणा देत होते, असे जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी म्हटले आहे. 

अवघ्या २० दिवसांत रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त