दिवाळी सुखानं साजरी करायची असेल तर भाजपचे दिवाळं काढाण्याची गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. हडपसरमधील प्रचार रॅलीत त्यांनी राज्यासह केंद्र सरकारवर तोफ डागली. पोलिस भरती, शिक्षक भरती, सरकारी नोकरीच्या किती संधी या सरकारने पाच वर्षांत उपलब्ध करुन दिल्या? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झाले? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
जळगावात मोदींचा कलम ३७०, तिहेरी तलाक विधेयकावर भर
राज्याच्या निवडणूक प्रचारात भाजपकडून कलम ३७० चा दाखला दिला जात आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. देशातील आणि राज्यातील प्रत्येकाच्या नसानसात देशभक्ती आहे. पण उपाशी पोटी सैन्य चालत नाही. जम्मू काश्मीर आणि लडाखचा मुद्दा वेगळा असून सत्ताधाऱ्यांनी राज्यातील मुद्यावर भाष्य करावे, असे आव्हानही त्यांनी भाजपला केले आहे.
चंद्र दाखवून दिशाभूल करणे थांबवा, राहुल गांधीचा मोदींना टोला
राज्यातील निवडणुकीत भाजप-शिवसेना महाआघाडीचे २२० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा दावा मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील नेते करत आहेत. यावर ते म्हणाले की २४ तारखेलेला खरे चित्र स्पष्ट होईल. त्यांचा बार फुसका निघेल, असा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.