कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार, कॅबिनेट मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचे हे ध्येय दोन्ही उमेदवारांनी ठरवले आहे. प्रचाराच्या आजच्या (शनिवार) अखेरच्या दिवशी खुद्द शरद पवार यांनी सभा घेत मतदारसंघातील वातावरण ढवळून काढले. राम शिंदे यांचेही दिवसाच्या अखेरच्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री मुलूखमैदानी तोफ अशी ख्याती असलेले अमित शहा यांच्या प्रचारसभेचे आयोजन केले होते. पण खराब हवामानामुळे त्यांच्या नियोजनावर पाणी फेरले गेले आहे. खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण होऊ न शकल्याने शहा यांचा दौरा अखेरच्या क्षणी रद्द झाली. सभेच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक आले होते. पण सर्वांच्या हाती निराशा आली.
कोर्टात मोबाइलची रिंग वाजली, सपा आमदाराला तीन तासांची कोठडी
कर्जत-जामखेड मतदारसंघ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष आहे. अखेरच्या क्षणी अमित शहांची सभा घेऊन भाजपच्या गोटात उत्साह आणण्याचे उमेदवार राम शिंदे यांचे मनसुबे हवामानाने उधळून लावल्याचे दिसते. आज सकाळापासून नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊसही पडतोय. शहांची उत्तर महाराष्ट्र ३ सभा होणार होत्या. त्यातील अकोले आणि कर्जत जामखेड येथे एक-एक सभा होणार होत्या. पण हवामान खराब असल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावा लागले. अकोले येथील सभेसाठी ते निघाले होते.
VIDEO: 'मियाँ मियाँ भाई' गाण्यावर खासदार ओवेसांचा डान्स
त्यानंतर ते शिर्डी विमानतळाकडे रवाना झाले. अखेर ते अकोले येथील सभेसाठी रवाना झाले. परंतु, ५ वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत असल्यामुळे त्यांना कर्जत-जामखेडला येणे जमणार नव्हते. त्यामुळे अखेर येथील त्यांची जाहीर प्रचार सभा अखेर रद्द करावी लागली.