पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहांनी कोल्हापुरात घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेताना अमित शहा (ANI)

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे अमित शहा हे सभेपूर्वी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेणार होते. परंतु, खराब हवामानामुळे त्यांना कोल्हापुरात येण्यास उशीर झाला. त्यामुळे ते थेट सभास्थळी गेले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ही माहिती देत आपण सभेनंतर दर्शनास जाणार असल्याचे सांगितले.

'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कलम ३७० बाबत प्रश्न विचारा'

सभा संपल्यानंतर अमित शहांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले. शहा यांच्याबरोबर भाजपचे पदाधिकारही उपस्थित होते. 

तत्पूर्वी, शहा यांनीही कोल्हापुरात कलम ३७० आणि तिहेरी तलाकचा मुद्दा आळवला. गेल्या ७० वर्षांत काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची हिंमत नव्हती पण ५६ इंच छातीच्या पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच कलम ३७० हटवले. पण काँग्रेस-राष्ट्रवादीने त्याला विरोध केला. कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुम्ही कलम ३७० बाबत तुमची भूमिका काय असा, जाब विचारा, असे आवाहन शहा यांनी मतदारांना केले.

'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Amit Shah offers prayers at Shri Ambabai Mahalaxmi Temple in Kolhapur