पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल

अमित शहा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुष्काळी जत (जि. सांगली) येथे आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात कलम ३७०, पाकिस्तान, जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भर दिला. त्याचबरोबर राज्यातील फडणवीस सरकारमुळेच सांगलीचा विकास झाल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे पडलेल्या महाराष्ट्राला विकसित राज्य केल्याचे ते म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोलही केला. त्यांचा विशेष रोख हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होता. पवार यांच्या आघाडीची राज्यात १५ वर्षे सत्ता होती. या १५ वर्षांत त्यांनी काय केले हे कधी सांगितले का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. 

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार

अमित शहांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे..

तब्बल ७० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमधून मोदी सरकारने कलम ३७० हटवले. काश्मीरमधील जनता आज शांतता अनुभवत आहे. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने याचा विरोध केला. राहुल गांधींनी शिवी द्यायची असेल तर मला द्या, पंतप्रधान मोदींना द्या पण त्या तुकडे करणाऱ्यांची बाजू घेऊ नका. 

५६ इंच छातीच्या पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चोख उत्तर दिले. पूर्वी मौनीबाबा मनमोहन सिंग यांच्या काळात जशास-तसे उत्तर दिले जात नसत. पण मोदींनी हे चित्रच बदलले. आज देश-विदेशात मोदी-मोदीचे नारे दिले जातात. हा मोदींचा किंवा भाजपचा सन्मान नाही. हा भारतातील जनतेचा सन्मान आहे. भाजप सरकारने कलम ३७०, तिहेरी तलाक सारख्या गोष्टी हटवल्या. देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम मोदींनी केले. भारतमातेचे तुकडे करणाऱ्यांना कारागृहात पाठवू.

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार

काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यात १५ वर्षे सरकार होते. या १५ वर्षांत राज्यासाठी काय केले हे शरद पवारांनी सांगावे. त्यांच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला त्यांनी रसातळाला आणले होते. त्यांच्या १५ वर्षांच्या तुलनेत ५ वर्षांच्या भाजप सरकारने मोठी कामगिरी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने राज्याला मोठा विकास निधी उपलब्ध करुन दिला. विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांसाठी पैसा कमी पडू दिला नाही.

करमाळ्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी रद्द, अपक्षाला पाठिंबा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 amit shah criticized on ncp congress sharad pawar in jat