जर एखाद्या पक्षातील एकही आमदार फुटला तर आम्ही सर्वांनी मिळवून एकच उमेदवार त्याच्याविरोधात देऊ. मग तो बंडखोर कसा निवडून येतो पाहू. महाराष्ट्रातील ४ पैकी जर तीन पक्ष एकत्र आले तर कोणताही 'माई का लाल' निवडून येणार नाही, असे चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांना दिले. नारायण राणे यांनी मंगळवारी रात्री माध्यमांशी बोलताना भाजपच्या सत्ता स्थापन करण्यासाठी जे काही करायला लागेल ते सर्व करणार आहोत, असे म्हटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला उल्लू बनवतोय : नारायण राणे
Ajit Pawar, NCP: If there is a situation of defection, three parties A,B and C will decide to back one common candidate then no one can defeat us. pic.twitter.com/X80W2sGoPJ
— ANI (@ANI) November 13, 2019
पवार पुढे म्हणाले की, नारायण राणेंचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका. आताच्या काळामध्ये सगळेजण आपापल्या पक्षांबरोबर राहतील. जर एखाद्या पक्षातील एका आमदाराने दबावाखाली राजीनामा दिला आणि तिथे जर निवडणूक लागली. तर महाराष्ट्रातील अ, ब आणि क पक्ष त्या बंडखोर उमेदवाराविऱोधात एकच उमेदवार उभा करुन त्याचा पराभव करतील. अशा परिस्थितीत कोणताच 'माई का लाल' निवडून येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
चला चला राष्ट्रपती राजवट आली, दालने सोडण्याची मंत्र्यांची वेळ झाली
मंगळवारी राज्यपालांना सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही तीन दिवस वाढवून मिळावेत यासाठी पत्र दिले होते. काँग्रेसचे नेते इथे नव्हते. त्याचबरोबर मंगळवारी सकाळी परिस्थितीही वेगळी होती. आम्हाली ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी वेळ हवी होती. त्यामुळे राज्यपालांना पत्र लिहिल्याचे पवार यांनी माध्यमांना सांगितले.