पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अलिबागमध्ये एकाच नावाच्या ५ जणांनी भरला उमेदवारी अर्ज

मध्यभागी शेकापचे विद्यमान आमदार सुभाष प्रभाकर पाटील आणि इतर

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत एकाच नावाचे दोन-तीन उमेदवार निवडणुकीत उभे असल्याचे दिसून आलेले आहे. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील अलिबाग मतदारसंघातून एकाच नावाच्या पाच जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शेकापचे विद्यमान आमदार सुभाष प्रभाकर पाटील यांनी हे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप केला आहे. कारण त्यांच्याच नावाच्या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पराभवाच्या भीतीने विरोधक खालच्या स्तराला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

थोडं थांबा, ८ तारखेला दसरा मेळाव्यातच बोलेनः उद्धव ठाकरे

शेकापचे सुभाष पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. चार अपक्ष उमेदवार यात सुभाष लक्ष्मण पाटील, सुभाष जनार्धन पाटील, सुभाष गंगाराम पाटील आणि सुभाष दामोदर पाटील यांनीही मंगळवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करायचा अखेरचा दिवस हा शुक्रवार आहे. येत्या २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

शेकापचे सुभाष पाटील 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना म्हणाले की, माझ्या नावाशी साधर्म्य असलेल्या चार जणांनी मंगळवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरला आहे. माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये आणखी काही उमेदवारांची भर पडेल. पण मी याकडे दुर्लक्ष करतो. 

मी कुठल्याही पक्षाचे किंवा विरोधकाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण विरोधकांना ही ट्रिक वापरुन मला पराभूत करता येईल, असे वाटते. परंतु, विरोधकांचा हा कट काही प्रत्यक्षात येणार नाही. माझ्या मतदारांना माझे निवडणूक चिन्ह माहीत आहे, आणि प्रचारकाळात आणखी मतदारांपर्यंत मी माझ्या पक्षाचे चिन्ह पोहोचवेल.

... म्हणून राज्यात शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावण्यास तयार

दरम्यान, अलिबाग येथील जागा युतीमध्ये शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत अजून औपचारिक घोषणा झालेली नाही. शेकापने या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केलेली आहे.

खासदार सुनील तटकरेंनाही हाच अनुभव


दरम्यान, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी खासदार सुनील तटकरे यांनाही रायगड मतदारसंघातून याच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी सुनील तटकरे नावाचे दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Alibaug five candidates with same name file nomination