पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरे उद्धवा! तेव्हा १ रुपयांत आरोग्य तपासणी का नाही केली?

अजित पवार

पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार संजय जगताप (काँग्रेस) यांना निवडून देऊन माझ्यासोबत विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सासवडमधील प्रचारसभेत केले. भर पावसामध्ये ज्याप्रमाणे महाआघाडीच्या सभेला तुम्ही उस्फुर्त प्रतिसाद देत आहात यातून २१ तारखेचा कौल आपल्या बाजूने लागेल याचा संकेत देणारा आहे. आगामी निवडणुकीत समोरच्याला तुम्ही  चारी मुंड्या चीत कराल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मला देशातला खलनायक ठरवलं- राज ठाकरे

लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्याने जगतापांना निवडून आणायचे आहे. पावसामधील सभेला होणारी गर्दी पाहून प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करायचं ते करुद्या. परंतु आपण गाफिल रहायचे नाही. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री विजय शिवतारे यांच्यावर नाव न घेता तोफ डागली. 
ज्यांनाराष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ते राष्ट्रवादी पुणे जिल्ह्यातून संपवण्याती आणि भाषा करत आहेत.  काही ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी जिल्ह्यात औषधालाही उरणार नसल्याची वक्तव्य देखील केली. बेट्या तुझी काय औकात आहे?  तुझ्या १० पिढ्या यायला पाहिजेत राष्ट्रवादी संपवायला. तू कुणाशी पंगा घेतो. तुझी सगळी अंडी पिल मला माहित आहेत, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता शिवतारे यांच्यावर तोफ डागली. या मतदार संघात शिवसेनाचा उमेदवार आहे त्यामुळे भाजपवर काही बोलत नाही, असे ते म्हणाले.   

आमच्या रोहितला साथ द्या, शरद पवारांचे कर्जत-जामखेडकरांना आवाहन

शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात एक रुपयांमध्ये आरोग्य तपासणी करु, अशी घोषणा केली आहे. यावरुन त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना निशाणा साधला. गेल्या पाच वर्षांपासून उद्धव ठाकरे भाजपसोबत सत्तेत आहेत. अरे उद्धवा पाच वर्षे तुमचे सरकारच होते. तुमचे मंत्री त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यावेळी १ रुपयात आरोग्य तपासणी का नाही केली? किती खोटे बोलाल. पाच वर्षांपूर्वी अशीच खोटी आश्वासने देऊन मते मागितली होती. एकही शब्द त्यांनी पाळला नाही. भाजपने म्हणायचे कर्जमाफी आणि शिवसेनेने म्हणायचे कर्जमुक्तीचा नारा दिला पण प्रत्यक्षात शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच नाही. पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील ४५ वर्षांत बेरोजगारीचा आकडा एवढा वाढला नव्हता, असे अजित पवार यावेळी म्हणाले.    

भाजपच्या मंत्र्यानेच 'चंपा' शब्द तयार केला, अजित पवारांचा गौप्यस्फोट