पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिंकलो नाही पण संपलो ही नाही, उदयनराजेंचं भावूक टि्वट

उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा तब्बल ९० हजार मतांनी पराभव केला. निकाल लागल्यानंतर उदयनराजे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज हरलो आहे, पण थांबलो नाही. जिंकलो आहे, पण संपलो नाही, असे टि्वट त्यांनी केली आहे. पराभवानंतर उदयनराजेंची ही पहिलीच सार्वजनिक प्रतिक्रिया आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभा घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पावसातील सभाही साताऱ्यात झाली होती. त्यानंतर राजकीय वातावरण बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

जनतेनं म्हटलंय, माज दाखवाल तर याद राखा, सेनेचा घरचा आहेर

उदयनराजे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, आज हरलो आहे पण थांबलो नाही. जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीत वाजतगाजत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण चार महिन्यात राष्ट्रवादीचा त्याग करुन उदयनराजेंचे भाजपत जाणे मतदारांना पसंत पडल्याचे दिसत नाही. उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

वारं फिरलंय, पण महायुती म्हणते आमचं ठरलंय !