पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकर मतदानास बाहेर पडलेला आमिर पहिलाच बॉलिवूड सेलिब्रिटी

आमिर खान

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला आहे.  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी पत्नीसह मतदान केलं. 

'प्रत्येक मतदारानं घराबाहेर पडा, मतदान करा'

 सकाळी लवकर जाऊन मतदान करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी आमिर खान पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. आमिरनं पत्नी किरणसोबत जाऊन मतदान केलं. आमिरनं माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या जतनेस घराबाहेर पडून  मतदान  करण्याचं आवाहन केलं आहे. आमिरबरोबरच लारा दत्ता, महेश भूपती, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, माधुरी दीक्षित या सेलिब्रिटींनी लवकर मतदान केलं. 

मुंबईकर वोट कर!, ५०% हून अधिक मतदान यंदा तरी होईल का?

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत १७  % मतदान झालं आहे.  हा आकडा समाधानकारक नसल्याचं अनेक राजकिय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेस मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Aamir Khan Kiran Rao first Bollywood celebs to cast vote