पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडकिल्ल्यांवर 'छमछम'ची व्यवस्था करणार का ?, पवारांचा सवाल

शरद पवार

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मागील १५ वर्षांत तुम्ही काय केले, असा सवाल केला होता. शरद पवार यांनी अमित शहांच्या प्रश्नाला उत्तरे दिली असून त्यांनी आता शहांनाच प्रश्ने विचारली आहेत. अकोले येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही काय केलंय, असे म्हणत पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या कार्याची यादीच सांगितली आणि आम्हाला विचारता पण तुम्ही काय केले ते सांगा, असे ते म्हणाले. गडकिल्ले पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केले. तिथे हॉटेल, बार काढायला परवानगी देणार आणि तिथे छमछमची व्यवस्था करणार? का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र उद्योगात एक नंबरचे राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. कारखानदारी उभी केली, हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली. धरणे बांधण्यासाठी पुढाकार घेतला. धरणं बांधण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक प्रागतिक निर्णय आम्ही घेतले. रोजगार हमी कायदा १९७८ साली एकमताने झाला तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री मी होतो. देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा पहिला निर्णय महाराष्ट्रात झाला तेव्हाही मीच मुख्यमंत्री होतो. 

'दिवाळीपूर्वी भाजप सरकारचं दिवाळं काढा'

शहासाहेब आपल्या राज्यात मंडल आयोगाच्या निर्णयावरून दंगली झाल्या. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय राबवला. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी काहींचा विरोध असतानाही आम्ही विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिले. 

तुम्ही काय केले? अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचे जाहीर केले. पण आजवर एका विटेचेही बांधकाम केले नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचं जाहीर केले. पण घटनेच्या शिल्पकाराचे स्मारक तुम्हाला ५ वर्षांत उभारता आले नाही आणि मला विचारतात तुम्ही काय केलं ?

अमित शहांनी कोल्हापुरात घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य चालवण्याचा निर्णय यांनी घेतला. मात्र महाराजांचा इतिहास ज्याठिकाणी तयार झाला ते गडकिल्ले इथून पुढे पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केले. तिथे हॉटेल, बार काढायला परवानगी देणार आणि तिथे छमछमची व्यवस्था करणार?

जिथे महाराजांची तलवार शौर्याने तेजाने चमकली त्याठिकाणी दारूचे अड्डे काढण्याचा निकाल या सरकारने घेतला. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार नाही.

याचे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले असे जाहीर केले. राज्यात कोणाला तरी याचा फायदा झालंय का? दुःख याचे आहे की महाराष्ट्र शेतीसाठी नावाजलेले राज्य, पण आज याठिकाणी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.

हजारो तरुणांच्या हाताचे काम काढून घेण्याचे काम यांनी केले आणि हे म्हणतात महाराष्ट्र आम्हाला पुढे न्यायचा आहे. मागील पंधरा वर्षात जे घडले नाही ते दिवे यांनी पाच वर्षांत लावले.

जळगावात मोदींचा कलम ३७०, तिहेरी तलाक विधेयकावर भर

विरोधकांचा आवाज दाबला जातोय

दडपशाही करण्याची भूमिका राज्यकर्ते घेतात. वर्ध्याच्या काही मुलांनी अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र दिले तर त्यांना कॉलेजमधून काढण्याचा हुकूम देण्यात आला. लोकशाहीत लोकप्रतिनिधीला पत्र लिहिण्याचा अधिकार उरला नाही. सीबीआय, ईडी, पोलीस यांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला जातोय.

त्यामुळे आज राज्यात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. यातून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला एक धक्का मिळेल की चुकीचे राज्य करणाऱ्याला लोकांची साथ नाही आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर करून लाभ-लोभ मिळवणाऱ्यांना घरी बसवण्याचे काम होईल.

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात, कारण..: मोहन भागवत