पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीच्या बैठकीबद्दल मला माहीत नाहीः शरद पवार

शरद पवार (ANI)

राज्यातील राजकीय तिढा सोडवण्याची चावी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात आहे. सोमवारी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये एकमत न झाल्याने राजकीय गुंता आणखी वाढला आहे. दरम्यान, राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच माध्यमांनी मुंबईत मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीत बैठक होणार असल्याचे बोलले जात होते. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी तुम्हाला बैठक आहे, असे कोण सांगितले असा उलट सवाल केला व बैठकीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. 

आमच्यात एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा नाहीः अजित पवार

दरम्यान, शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. सुमारे १५ ते २० मिनिटे शरद पवार हे संजय राऊतांसोबत होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस यावेळी त्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी राजकीय चर्चा झाली की नाही, याची माहिती मिळालेली नाही. छातीत दुखत असल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सोमवारी दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सोमवारीच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली.

शरद पवार यांनी लीलावतीमध्ये घेतली संजय राऊतांची भेट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly congress 2019 Who says there is a meeting with congress I dont know NCP Chief Sharad Pawar