पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिन्ही पक्षांकडून संविधानाची पायमल्ली, फडणवीसांचा आरोप

विधानभवनाबाहेर भाजपने घोषणाबाजी केली. (Photo Anshuman poyrekar)

विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या अधिवेशनावर आक्षेप नोंदवत भाजपने शिरगणतीच्या वेळी सभात्याग केला. हे अधिवेशनच बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष संविधानाची पायमल्ली करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 

ते पुढे म्हणाले की, आजचे कामकाजच संविधानाची पायमल्ली करुन चालवले जात आहे. मागच्या अधिवेशनात राष्ट्रगीत वाजवून संपवण्यात आले होते. त्यामुळे हे अधिवेशनच बेकायदेशीर आहे. नव्या अधिवेशनाचे समन्स काढण्यात आले नाही.

सुरुवातीलाचा तीन पक्षांनी संविधानाची पायमल्ली केली. गुप्त मतदान पद्धतीने निवडला तर आपला उमेदवार पडेल अशी त्यांना भीती वाटत होती. त्यांच्या आमदारांवर त्यांचा विश्वास नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, संविधानाची पायमल्ली त्यांनी केली, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शपथ घेताना कोणाचेही नाव घ्यायचे नसते. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर शपथ जशीच्या तशीच घ्यावी लागते. त्यामुळे तो शपथविधीही बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly BJP leader Devendra Fadnavis on Opposition MLAs walkout of state Assembly ahead of floor test