विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेला प्रचार शनिवारी संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आता आजचा अर्थात शुक्रवारचा पूर्ण दिवस आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत वेळ आहे. त्यानंतर सोमवारी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात प्रचारामुळे, जाहीर सभांमुळे, राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे, रॅलींमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभांमुळे या आठवड्यात राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.
मतदानाला जाताय मग हे नक्की वाचा
सात ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. सत्ताधारी आणि विरोधकांनी अक्षरशः राज्य पिंजून काढले. आता मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे पुढील गुरुवारी मतमोजणीच्या दिवशीच समजेल.