पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरु आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमुळे अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या इच्छुकांनी बंडखोरीचे आव्हान दिले आहे. त्यामुळे या बंडखोरांना शांत करण्याचे आणि मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. 

धक्कादायक! भुसावळमध्ये भाजप नगरसेवकांसह कुटुंबातील ५ जणांची हत्या

बंडखोऱ्याचे सर्वात जास्त आव्हान शिवसेना-भाजपच्या महायुतीला आहे. कारण २७ मतदारसंघामध्ये ११४ बंडखोर महायुतीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे रविवारपासून या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे आज कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात ४७४३ उमेदवारांचे अर्ज वैध, ८०० जण निवडणुकीतून बाहेर

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.