पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला; हल्लेखोराला अटक

ओमराजे निंबाळकरांवार चाकू हल्ला

उस्मानाबादमध्ये शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ओमराजे निंबाळकर पडोळी (नायगाव) येथे आले होते. पडोळी गावातील रस्त्यावरून चालत प्रचार करत असताना एका तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. सुदैवाने ओमराजे निंबाळकर यांना गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर अजिंक्य टेकाळे याला अटक केली आहे. 

'कलम ३७०चा महाराष्ट्राशी काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे'

प्रचार रॅलीमध्ये घुसून अजिंक्य टेकाळे याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला केला. ओमराजे निंबाळकर यांच्या हातात हात देऊन दुसऱ्या हाताने या तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हातातील घडाळ्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या हाताला  किरकोळ जखम झाली असल्याचे सांगितले जात आहे.  

INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना ED कडून अटक

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरु करत त्याला अटक केली आहे. अजिंक्य टेकाळे असं हल्लेखोराचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. तर, तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळे मी सुखरुप असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली. 

'भाजपचे संकल्पपत्र म्हणेज निव्वळ गाजरांचा पाऊस'