पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केबीसीमध्ये एक कोटी जिंकणाऱ्या बबिता ताडेंकडे निवडणूक आयोगाने दिली मोठी जबाबदारी

बबिता ताडे आणि अमिताभ बच्चन

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक कोटी जिंकल्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बबिता ताडे यांची अमरावती जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

थोडं थांबा, ८ तारखेला दसरा मेळाव्यातच बोलेनः उद्धव ठाकरे

देशात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून एक कार्यक्रम राबविला जात आहे. याच कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्यात बबिता ताडे यांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बबिता ताडे या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमधील रहिवासी आहेत. त्या सरकारी शाळेमध्ये माधान्ह भोजन शिजविण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेऊन एक कोटी रुपये जिंकले होते. विविध प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन त्यांनी ही रक्कम जिंकली होती.

.. म्हणून राज्यात शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावण्यास तयार

अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे आणि त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम बबिता ताडे यांना करावे लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध प्रचार मोहिमही आखण्यात येणार आहे.