पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

 देशात मंदी आहे की नाही याबद्दल दुमत असू शकते. पण लोकांच्या नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे सर्व डोळ्यांना दिसत असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र

उद्धव ठाकरे म्हणाले, देशात आर्थिक मंदीची स्थिती आहे की नाही हे आपण नंतर बघू. पण लोकांच्या नोकऱ्या जाताहेत. उद्योग बंद पडू लागले आहेत, हे सर्व डोळ्यांना दिसते आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार केला पाहिजे. मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्यातील प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले, ज्या बाबूंनी झाडे तोडली आहेत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. मुंबई मेट्रोच्या कारशेडला आमचा विरोध नाही. पण कारशेडची जी जागा निवडण्यात आली आहे. त्याला नक्कीच आमचा विरोध आहे.

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा

मेट्रो ३च्या कारशेडसाठी गेल्या शुक्रवारी रात्रीपासून आरे कॉलनीमधील २१४१ झाडे तोडण्यात आली आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने झाडे तोडण्याला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर वृक्षतोड थांबविण्यात आली.

आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सक्तवसुली संचालनालय किंवा केंद्रीय अन्वेषण विभाग या सारख्या तपास संस्थांना वापर केला नाही पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सूडाचे राजकारण कधीच केले जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध शिखर बँकेतील गैरव्यवहारांप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. निवडणुकीपूर्वी या गोष्टीची गरज नव्हती, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध; तरुणांनी पाठवला दोन हजारांचा चेक