पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसला माझ्या सेवेची गरज नाही, संजय निरुपम यांची जाहीर नाराजी

काँग्रेस नेते संजय निरुपम

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षामधले अंतर्गत कलह पुन्हा एकदा चवाट्यावर आले आहेत. काँग्रेस नेते  संजय निरुपम यांनी ट्विटर जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. काँग्रेस पक्षाला माझ्या सेवेची गरज नसल्याचं दिसतंय असं म्हणत पक्षश्रेष्ठींविरोधातही नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे.

आदित्यला आशीर्वाद देणाऱ्यांचा ऋणी, उद्धव ठाकरेंचे 'मनसे' आभार

 संजय निरुपम यांनी सुचवलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं नाही, यामुळे निरुपम नाराज झाले आहेत. 'विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमधून मी एकच नाव सुचवलं होतं, मात्र त्या नावाचा विचारच केला गेला नाही असं माझ्या कानावर आलं. आता मी पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार नाही, हा माझा अंतिम निर्णय असल्याचं मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे', असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाला माझ्या सेवेची गरज नसल्याचं म्हणत ट्विटद्वारे त्यानं काँग्रेसविरोधात उघड नाराजी दर्शवली आहे. 

मनसेला धक्का, नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश 

ज्या पद्धतीची वागणूक मला पक्षश्रेष्ठींकडून मिळत आहे ते पाहता आता काँग्रेस सोडण्याचे दिवस दूर नसतील असं सूचक व्यक्तव्यही एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी केलं आहे. 

पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने, दोघांनीही जाहीर केले उमेदवार