पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकांच्या इच्छेचा मान ठेवला - संदीप नाईक

गणेश नाईक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी मुलगा संदीप नाईक याने निवडणुकीतून माघार घेतली. 'मी कोणताही त्याग केलेला नाही. हा सर्वस्वी माझा निर्णय होता', असं संदीप नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. संदीप नाईक यांना भाजपने ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. भाजपने १२५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. मात्र, या यादीतून गणेश नाईक यांचं नाव नव्हतं. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी वडिलांसाठी आपली जागा सोडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. 

'आम्ही भाजपच्या नेतृत्त्वाचा आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर करतो. गणेश नाईक यांनीच निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, गणेश नाईक यांनी बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी इच्छा कधीही व्यक्त केली नव्हती', असंही  गणेश नाईक यांचे चिरंजीव आणि माझी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. 

'वडिलांनीच निवडणूक लढवावी असं मला, संदीपला कार्यकर्त्यांना  आणि स्थानिकांनाही वाटत होतं. लोकांच्या इच्छेचा आदर ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच संदीपनं माघार घेतली' असंही संजीव यांनी सांगितलं. 

अलिबागमध्ये एकाच नावाच्या ५ जणांनी भरला उमेदवारी अर्ज

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु होती. गणेश नाईकांना सुद्धा बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नवी मुंबईतील एरोली मतदारसंघातून संदीप नाईक आणि बेलापूर मतदारसंघात पुन्हा आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला.

थोडं थांबा, ८ तारखेला दसरा मेळाव्यातच बोलेनः उद्धव ठाकरे

नाराज झालेल्या गणेश नाईक यांनी बुधवारी सकाळी सीबीडी येथील महापौर बंगल्यावर सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला त्यांचे संदीप नाईक, संजीव नाईक आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. या बैठकीमध्ये संदीप नाईक यांच्याऐवजी ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला.