पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये दारूबंदी हटलीच पाहिजे; महिला उमेदवाराचा अजब प्रचार

वनिता राऊत

विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला सर्वच उमेदवारांनी सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारुबंदी आहे. असे असताना चंद्रपूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एका महिला उमेदवाराने दारुबंदी हटलीच पाहिजे असे प्रचार पत्रकात म्हटले आहे. गाव तिथं बिअर बार, अशी ही घोषणा त्यांनी केली आहे. 'मी आमदार झाली तर दारुबंदी हटवण्यासाठी प्रयत्न करेल. बेरोजगार तरुणांना दारु विक्रीसाठी परवाने मिळवून देईल.' असे म्हणत त्यांनी दारुबंदी हटवण्यासाठी सर्वजण मतदान करतील असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पुण्यात रनमशीन बरसली! सचिन, सेहवागचा विक्रम टाकला मागे

चंद्रपूरच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उभ्या राहिलेल्या वनिता राऊत या महिला उमेदवाराने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी प्रचार पत्रकामध्ये दारुबंदी हटलीच पाहिजे असे म्हटले आहे. चंद्रपूर  जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या दारूबंदीचा कसा फज्जा उडाला हे त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे. मी निवडून आल्यास दारू कशी सुरू होईल याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वनिता राऊत यांनी याच मुद्द्याला धरून प्रचाराला सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का? - अमित शहा

त्यांनी प्रचार पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, 'माझ्या क्षेत्रातील जनता चोरुन लपून आणि दुप्पट-तिप्पट भावाने दारु पिताना हे पाहून मला फार दु:ख होत आहे. मला वाटते जबरदस्तीने दारुबंदी हे पाप आहे. दारुमुळे कुटुंब उध्वस्त होतात असा तर्क आहे. कदाचित खरा देखील आहे. पण दारुबंदी हा त्यावर उपाय नाही. नवरा बायको पोरं मिळून तंबाखू खातात, त्याचप्रमाणे त्यांनी मिळून दारु पिणे हा त्यावर एक योग्य मार्ग आहे.', असे सांगत दारुबंदी केल्याने समजात सुधारणा होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

३७१ कलमाबद्दलही बोला, शरद पवारांचा भाजपला प्रश्न