पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिकीट का मिळाले नाही याचे आत्मपरीक्षण करतोय - विनोद तावडे

विनोद तावडे

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या संस्कारात वाढलो आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणे हेच आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे सध्या उमेदवारी का नाकारण्यात आली, याकडे बघण्यापेक्षा भाजपला दोन तृतीयांश बहुमताने विजय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी सांगितले. मला तिकीट का मिळाले नाही, याचे आत्मपरीक्षण मी करतो आहे, असेही ते म्हणाले.

मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या

भाजपची चौथी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर झाली. त्यामध्ये बोरिवली मतदारसंघातून विनोद तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप विनोद तावडे यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी मी कार्यक्षमपणे पार पाडली. माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. माझं काय चुकलं, मला माहिती नाही. पण जरी चुकलं असेल तरी पक्ष पुन्हा संधी देईल, असा मला विश्वास आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या संस्कारात वाढलो आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणे हेच आमचे काम आहे. 

रेपो दरात पुन्हा पाव टक्का कपात, कर्जे आणखी स्वस्त

भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी देश पहिला, नंतर आपला पक्ष आणि नंतर स्वतः हेच धोरण आहे. आता भाजपला दोन तृतीयांश बहुमताने निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पक्षाच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.