पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मी आजपर्यंतचा नशीबवान किंवा भाग्यवान मुख्यमंत्री आहे. आजवर जे विरोधात होते ते मित्र झाले आणि मित्र असलेले विरोधात गेले. ते विरोधात असले तरी माझे मित्रच आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले. अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना अनेकवेळा चिमटे काढले. मी येथे येईन (विधान भवन) असे कधी बोललो नव्हतो. तरीही मी येथे आलो, टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांच्या जागेवर जात त्यांचे अभिनंदन केले.

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा परिचय पत्र माझ्या हातात आले. हा परिचय आधी आला असता तर बरे झाले असते. माजी मुख्यमंत्री आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. बंद दाराआड काय बोललो हे सांगायची आमची संस्कृती नाही. जे विरोधात होते ते आता मित्रपक्ष झाले. मी येथे येईन असे कधी बोललो नव्हतो, तरीही मी येथे आलो. गेल्या पाच वर्षांत फडणवीसांकडून मी खूप शिकलो. विरोधक म्हणून तुम्ही सूचना द्या, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली. 

राज्यातील सात/बारा कोरा करायलाच पाहिजे नाहीतर शेतकऱ्याला चिंतामुक्त करायचे आहे. तुमची माझी मैत्री कायम आहे. यापुढेही आमचे हिंदुत्व कायम राहिल. त्या हिंदुत्त्वामध्ये दिलेला शब्द पाळणे हे माझे हिंदुत्त्व आहे. गेल्या पाच वर्षांत मी कधी दगा दिला नाही. जे काही बोलायचे, जे काही करायचे ते स्पष्ट बोलायचे, काळोखात काही करायचे नाही, हे मी माझ्या आमदारांना सांगितले होते. चांगल्या कामाआड आमचा पक्ष कधीच आला नाही. आपण दोघे मिळून काम करुयात. मी तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही. एका जबाबदार पक्षाचा नेता म्हणून मी तुमचे अभिनंदन करतो. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:I have never told anyone that I will be coming here but I came says cm uddhav thackeray in maharashtra assembly to devendra fadnavis