पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांना अधिकारच नाहीत, मी तुमची जबाबदारी घेतोय : शरद पवार

शरद पवार

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी १६२ आमदारांच्या उपस्थित ग्रँड हयात हॉटेलमध्ये ओळख परेडच्या रुपात शक्ती प्रदर्शन केले. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. तसा डाव महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही. आमच्यावर काही चुकीचं लादण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा इशार शरद पवार यांनी भाजपला दिला. जर कुणी आडवा आला तर शिवसेना बघून घेईल, असे पवार उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून म्हणाले. 

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयईडीसह तिघांना अटक

राज्यात बहुमत नसताना चुकीच्या पद्धतीने सत्तास्थापन करण्यात आली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार पाहायला मिळते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच आपण सत्तास्थापन करु, असा विश्वासही शरद पवारांनी राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना दिला. 

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

आपण गटनेतेपदी अजित पवारांची निवड केली. मात्र ते तिकडे गेले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना व्हिपचा अधिकार आहे, असे सांगून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. आदेश देण्याचा अधिकार निलंबित केलेल्या नेत्याला नसतो. ज्याला सदस्यत्व जाण्याची भीती आहे, त्यांची मी वैयक्तिक जबाबदारी घेतो, असेही शरद पवार यांनी सांगितले.