पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी आदरणीय साहेबांसोबतच, संभ्रम निर्माण करु नका : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे आणि शरद पवार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नॉट रिचेबल असलेल्या धनंजय मुंडेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वाय. बी. चव्हाण येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत सहभागी होऊन धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत असल्याचे संकेत दिले. मात्र त्यांच्या उपस्थितीनंतरही त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न, 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?

धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अजित पवारांनीच त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. अखेर धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मी पक्षासोबत आणि आदरणीय पवार साहेबांसोबत आहे. कृपया कोणताही संभ्रम निर्माण करु नये, अशी विनंती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.  

BJP सोबत जाण्याचा प्रश्नच नाही, ठरलंय तेच होणार : शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यातील वादामुळे  सत्तास्थापनेचा तेढ निर्माण झाला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रवादीचे काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्तास्थापनेचे प्रयत्न अखेरच्या टप्प्यात असताना अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणाला एक वेगळे वळण निर्माण झाले आहे.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: I am with party I am with Pawar saheb Nationalist Congress Party leader Dhananjay Munde