पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला उल्लू बनवतोय : नारायण राणे

नारायण राणे

सत्ता स्थापनेची मोठी जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दिल्याचे सांगत भाजप सत्तास्थापनेच्या शर्यतीत पुन्हा उतरल्याचे संकेत भाजप नेते नारायण राणे यांनी दिले आहेत. सध्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे. यासंदर्भात मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करुया असे म्हटले आहे. भाजप लवकरात लवकर सत्ता स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा कायम - उध्दव ठाकरे

सत्ता स्थापन करण्यासाठी जे काही करायला लागेल ते सर्व करणार आहोत. मी माझ्यापरिने  सर्वोत्परी सहकार्य करेने असेही ते म्हणाले. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणे अशक्य आहे, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठका होत आहेत. काँग्रेसच्या नेते कसे आहेत याचा शिवसेनेचा अभ्यास कच्चा आहे. ते समोर येऊन काय बोलतात. पाठिमागे काय बोलतात आणि पत्रकार परिषदेमध्ये काय सांगतात याचा सेनेने अभ्यास करायला पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला उल्लू बनवत आहे, असा चिमटाही त्यांनी सेनाला काढला. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

राज्यातील राष्ट्रपती राजवटीची खापर देखील त्यांनी शिवसेनेवर फोडले. सेनेच्या अट्टाहासामुळे राज्यावरही वेळ आली आहे. भाजप त्यातून मार्ग काढेल. लवकरच नवे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही राणेंनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यातील विधानसभेत भाजपने सत्तास्थापनेमध्ये असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चाही रंगली मात्र, राज्यपालांनी दिलेल्या वेळेत त्यांना अपयश आले. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. पण राष्ट्रवादीने अधिक वेळ मागितल्यानंतर राज्यपालांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजप पुन्हा फ्रंटफूटवर आले असून त्यांनी सरकार स्थापनेसंदर्भातील हालचालीचे संकेतच राणे यांच्या विधानातून मिळत आहेत.