पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (रविवार) विधान भवनात नवनिर्वाचित सदस्यांसमोर अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपाल कोश्यारी यांनी आपले संपूर्ण भाषण मराठीतून वाचून दाखवले. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे अभिनंदन करत सरकारच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. मुंबईत मराठी भाषा केंद्र स्थापन करणे आणि सीमाभागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधान भवनात राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. 

मी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणातील गोषवारा..

माझे सरकार शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून आवश्यक ते पाऊल उचलेल. महात्म्यांच्या आदर्शावर राज्य वाटचाल करेल. वाढती बेरोजगारी ही शासनासमोरील मोठी समस्या आहे. विकासकामे करण्यासाठी सरकार बांधील असेल. माझे शासन हे शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काम करेल. सीमा भागातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करु.

'पुढे काय करायचं, थोडा वेळ द्या'; पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार ?

रोजगार निर्मिती, भूमिपुत्रांना प्राधान्यासाठी कायदा करेल. मराठवाडा, विदर्भासाठी विशेष स्तरावर शासन काम करेल. महिला सुरक्षा, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करु, वसतीगृहांची निर्मिती करु. अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई करुन देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. गड, किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करु. आरोग्य, शिक्षण, उद्योग स्तरावर कामाला प्राधान्य दिले जाईल. माझे शासन सर्व जातीधर्मातील गोरगरीब जनतेसाठी काम करेल. मुंबईत मराठी भाषा केंद्र स्थापन केले जाईल.

मेरीट नसलेल्यांनी सत्ता मिळवली: फडणवीस