पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान नाही

भाजप-शिवसेना यांच्यात चर्चेनेच तोडगा निघू शकेल, असेही गिरिश महाजन यांनी म्हटले आहे.

युतीही काल परवाची नाही. त्यामुळे दोन दिवसांत सर्व काही ठिक होईल, असे मत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्रीपदावर भाजप कोणतीही तडजो़ड करणार नसल्याचे संकेत देखील गिरीश महाजन यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिले आहेत. मागील १२ दिवसांपासून शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: अजित पवार

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपकडून हालचाली वाढल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या मुंबईतील निवासस्थानी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात येणार असल्याची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते.  अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरही शिवसेनेसोबत चर्चा करु असे ते म्हणाले. यावर संजय राऊत यांनी भाजपने समंजसपणाची भूमिका घेतल्याचे म्हटले. मात्र जे ठरलं आहे त्याबाबत भाजपने लिखित स्वरुपात द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप

मात्र, गरिश महाजन यांनी पाच वर्षे फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असे संकेत दिले आहेत. भाजप-शिवसेना यांच्यातील युती ही काल-परवाची नाही. लेखी स्वरुपात तिढा सुटणार नाही. यासंदर्भात चर्चा व्हायला हवी. लेखी स्वरुपात द्यायला आपण हिंदुस्थान-पाकिस्तान नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. राज्यातील जनतेने एका विचाराला मतप्रवाहाला मतदान दिले आहे. शिवसेनेची चर्चा करायला तयार नाही. त्यांनी टोकाची भूमिका घेतल्यानंतरही आम्ही मोठ्या भावाच्या रुपात त्यांना काही प्रत्त्युतर दिलेले नाही. दोन दिवसांत तोडगा निघेल, याबाबत आशादायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.