पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संदीप नाईक ऐवजी गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढवणार

गणेश नाईक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी मुलगा संदीप नाईक याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपने १२५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. मात्र, या यादीतून गणेश नाईक यांचा पत्ता कट केला. त्यांचे सुपूत्र संदीप नाईक यांना भाजपने ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. दरम्यान, उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या वडिलांसाठी संदीप नाईक यांनी माघार घेतली असून, ऐरोलीतून गणेश नाईक निवडणूक लढविणार आहे. त्यांना भाजपने एबी फॉर्म दिला देखील दिला आहे. 

... म्हणून राज्यात शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावण्यास तयार

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु होती. गणेश नाईकांना सुद्धा बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नवी मुंबईतील एरोली मतदारसंघातून संदीप नाईक आणि बेलापूर मतदारसंघात पुन्हा आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला.

'काही लोकं आरएसएसला देशाचे प्रतीक बनवू इच्छित आहेत'

नाराज झालेल्या गणेश नाईक यांनी बुधवारी सकाळी सीबीडी येथील महापौर बंगल्यावर सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला त्यांचे संदीप नाईक, संजीव नाईक आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. या बैठकीमध्ये संदीप नाईक यांच्याऐवजी ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार भाजपने देखील गणेश नाईक यांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी दिली असून एबी फॉर्म देखील दिला आहे.  

जर्सी ब्लू असो वा व्हाइट रोहित 'हिट'च : भज्जी