पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक भरारी पथकाने कारमधून ४ कोटी केले जप्त

४ कोटी रुपये जप्त

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. आता सर्व उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबईत ४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे. 

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता

वरळी-सी लिंकवरील चेकपोस्टजवळ एका कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या तपास अधिकारी सुषमा सातपुते यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. कारची तपासणी केली असता त्यामध्ये ऐवढी मोठी रक्कम आढळून  आली. साताऱ्यातल्या जावळी येथील दत्तात्रय महाराज कळंबे पतसंस्थेची ही रक्कम असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या तपास अधिकाऱ्याने दिली. 

पंकजा यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल धनंजय मुंडेंविरोधात

कोणत्याही सुरक्षेशिवाय तसंच एकही अधिकारी सोबत नसताना एका खासगी गाडीतून ऐवढी मोठी रक्कम घेऊन जात असल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केलेल्या रक्कमेसंदर्भात पतसंस्थेचे कर्मचारी योग्य उत्तर देऊ न शकल्यामुळे हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे. हे पैसे घेऊ जाणाऱ्या कारचालकाला ताब्यात घेतेल असून त्याची चौकशी सुरु आहे. 

कलाकारांनी PM मोदींसोबत केली गांधी विचारांबाबत खास चर्चा