पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर फडणवीसांची पहिली टीका

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आपल्या किमान समान कार्यक्रमात मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.  

महाराष्ट्रात ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान 

विकासाच्या वाटचालीत मागासलेल्या क्षेत्राचा साधा उल्लेखही नाही हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर त्यांनी ट्विटच्या माध्यमातून नव्या अघाडीवर हल्ला चढवला. विधानसभा निकालानंतर महिन्याभराच्या सत्तासंघर्षानंतर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. महाआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. शपथविधीच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थितीत होते. 

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बुहमत दिले असताना भाजप-शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रिपदावरुन वाद पेटला. भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व करण्यावर ठाम राहिला तर शिवसेना ठरल्याप्रमाणे अर्धा वाटा मागण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेर भाजपशी काडीमोड घेत ३० वर्षांची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने उद्धव ठाकरे यांच्या रुपात महाराष्ट्राला ठाकरे घरण्यातील पहिला मुख्यमंत्री दिला.  पुढे काय काय गोष्टी समोर येणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Cm Devendra Fadanvis Criticized Mahavkias Aaghadi Government common minimum programme