पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी पुन्हा येईन'; शिवतीर्थावर फडणवीसांविरोधात घोषणाबाजी

फडणवीसांसमोर घोषणाबाजी

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर भाजप नेते शिवतीर्थावर येणार की नाही अशी चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवतीर्थावर येऊन या चर्चेंना पूर्णविराम दिला. 

शिवसेनेला कोणी शहाणपण शिकवू नये, संजय राऊत यांचा

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. फडणवीस यांच्याव्यतिरिक्त माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजप-शिवसेना-युतीचे श्रद्धास्थान असल्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी केला. त्यांच्या विचारांवर आम्ही चालत असून पुढेही चालत राहू, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या. मात्र देवेंद्र फडणवीस कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.

निरंजनी आखाड्याच्या महंतांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

ज्यावेळी मुख्यमंत्री आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी जात होते त्यावेळी शिवसैनिकांकडून 'मी पुन्हा येईन..' अशी घोषणाबाजी करण्यात आली. टसरकार कुणाचं शिवसेनेचं',  'आवाज कुणाचा...शिवसेनेचा', 'ताकद कुणाची शिवसेनेची' अशाही घोषणा देण्यात आल्या. उल्लेखनिय आहे की, मुख्यमंत्रीपदावरुनच भाजप-शिवसेना यांच्यातील युती तुटली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:former chief minister and bjp leader devendra fadnavis paid tribute to balasaheb thackeray visiting shivaji park