पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होते का? - शरद पवार

शरद पवार

पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होते का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील प्रचारसभेत उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. त्यांचे हे जोडीदार म्हणून यांचे नाव पुढे आले, असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

झाकीर नाईकच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन १२७ तरूण आयसिसच्या संपर्कात

ते म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी निवडून आले तर आम्ही त्यांच्या सन्मान करतो. सत्तेत आल्यावर समाजातील सगळ्यांना लाभ देणे हे सत्ताधाऱ्यांचे काम असते. पण आज सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जातो. काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ले करणे, त्यांच्यावर खटला भरणे यासाठी सत्ता हवी का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुख्यालयावर छापा टाकण्यात आल्याचा उल्लेख करून शरद पवार म्हणाले, काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा भाजपच्या कार्यालयात पोलिसांना, सीबीआयला पाठवले नव्हते. पण आता केवळ सुडाचे राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी उस्मानाबादमध्ये शाळेची संरक्षण भिंत तोडली

देशाचे पंतप्रधान पद हे महत्त्वाचे आहे. पण त्या पदावर बसलेल्या व्यक्तीनेही त्यांची प्रतिष्ठा जपली जाईल, असे वागले पाहिजे, असे ते म्हणाले.