पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिला असताना सुद्धा महाराष्ट्रात सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढावणे, हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा कायम - उध्दव ठाकरे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. पण राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. परिणामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. सध्याच्या घडीला राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल.

आमचं अजून ठरलेलं नाही, आघाडीने मांडली भूमिका

सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.