पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकनाथ खडसे माझ्या संपर्कात - शरद पवार

शरद पवार

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही नेते आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी भाजपमध्येही अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी आताच तयार झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे नेते त्या पक्षात नाराज आहेत आणि आपल्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

शरद पवार म्हणाले, राज्यातील लोकांना आता बदल हवा आहे. विरोधकांच्या मागे खोट्या चौकशा लावून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे. पण सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय हवेने आपली दिशा बदलली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारच सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असून, आपल्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावत असल्याचेही ते म्हणाले.

राजकीय नेत्यांना कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी मतदारांनाही या नेत्यांना पाडण्याचा अधिकार असल्याचे सांगून ते म्हणाले, अनेक नेते पक्षातून बाहेर पडल्यामुळे सध्या तरूण नेतृत्त्वामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांना आता संधी मिळणार आहे. 

'काश्मीरमधील नजरकैदेतील राजकीय नेत्यांची टप्याटप्याने सुटका'

कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ex BJP minister Eknath Khadse and few other BJP leaders are in contact with me informed Sharad Pawar