पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदींच्या सभेसाठी वृक्षतोड, या गोष्टीचा बाऊ करण्याची गरज काय?'

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुण्यामध्ये १७ ऑक्टोबर रोजी मोदींची सभा आहे. या सभेसाठी एस. पी कॉलेज मैदानातील झाडे कापड्यात आली आहे. झाडांच्या कत्तलीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र या मुद्दाचा बाऊ करण्याचं कारण काय असा प्रश्न केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. यापूर्वीही झाडं कापण्यात आली होती मात्र तेवढंच वृक्षारोपणही करण्यात आलं होतं असं ते म्हणाले. 

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

प्रत्येक वेळी झा़डं कापल्यानंतर आम्ही तेवढीच झाडं लावतोही वनविभागाचा तो नियमच आहे. मोदींच्या रॅलीसाठी झाडं कापली यावरून गोंधळाचं कारण काय? यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या सभेसाठीही झाडे कापण्यात आली होती. इतरही सभांच्यावेळी झाडं कापण्यात आली होती. मात्र त्यावेळी जनजागृती का नाही झाली याचं राहून राहून मला आश्चर्य वाटतं, असं ते पीटीआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, संभाजी पूल दुचाकींसाठी खुला

पुण्यातल्या एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी  २० ते २५ झाडांची कत्तल करण्यात आली आहे.  तर काही झाडं मुळापासून तोडण्यात आली आहेत. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्यात येत आहे. व्यासपीठ उभारण्यात अडचण येत असल्याने ही झाडे कापण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यासाठी परवानगी देखील घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुणे महापालिकेच्या परवानगीने ही झाडे कापण्यात आली, असे शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी सांगितले.