चौथीच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा भाजपचा कट आहे', अशी टीका विधान परीषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घातले, उदयनराजे कडाडले
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून चौथीच्या पाठ्यपुस्तकात असणारा छत्रपतींवरचा धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चूकीचा आणि अपमानास्पद असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस सावरकर विरोधी नाही : मनमोहन सिंग
दरम्यान, चौथीच्या पुस्तकातील छत्रपती शिवरायांवरील धडा वगळू नये अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसंच, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याचा भाजपाचा हा कट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला २१ तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.