पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

योग्यवेळी योग्य गोष्टी सांगेन, काळजी करु नकाः देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

ऐनवेळी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अखेर मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्यांच्याविरोधात भ्रष्ट्राचाराचे रान उठवले होते. त्यांच्याशी आघाडी केल्यामुळे राज्यातून भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी योग्यवेळी योग्य उत्तर देईन, काळजी करु नका, असे म्हटले. 

... म्हणून मुख्यमंत्र्यांशिवाय आमदारांचा शपथविधी पार पडला

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर विधानभवना बाहेर पडलेल्या फडणवीसांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. अजित पवारांचा पाठिंबा घेणे ही भाजपची चूक होती का?, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी योग्यवेळी याचे उत्तर देऊ असे म्हटले. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. ठाकरे यांच्याकडून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आल्यानंतर राज्यपाल बी के कोश्यारी यांच्या कार्यालयाच्या वतीने त्याला दुजोरा देण्यात आला. 

महाविकास आघाडीत इतर कोणाला काय मिळणार?

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत नव्या सरकारचा शपथविधी समारंभ हा एक डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, राज्यपाल आणि ठाकरे यांच्या भेटीनंतर वेळापत्रकात बदल करण्यात आला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Devendra Fadnavis on if it was a mistake to ally with Ajit Pawar says I will say the right thing at the right time