पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरावर संकट आले म्हणून पळायचे नसते: बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

'घरावर संकट आले म्हणून पळायचे नसते तर खंबीरपणे सामना करायचा असतो.', असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्ष सोडून पळणाऱ्यांवर टीका केली आहे. स्वराज्य आणि छत्रपतींच्या रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली. या विचारांचा आदर्श ठेवून काँग्रेसच्या अडचणीच्या काळात आपण राज्यभर काम करत आहोत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर इथे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

...तर पवाराची औलाद सांगणार नाही: अजित पवार

या सभेदरम्यान बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आणि भजापवर जोरदार टीका केली आहे. 'भाजप-सेना सरकारने सर्वांना फसविले असून हे पुर्णपणे अपयशी ठरल्याने शेतकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या हितासह तालुक्यांच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या' असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसंच बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत यावेळी शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ऐतिहासिक दिवस, पहिले राफेल विमान भारतीय हवाई दलाकडे

'अडचणीच्या काळात अनेक जण पक्ष सोडून पळाले जनतेला अशी पळापळी मान्य नसते. राज्य सरकारने फक्त घोषणाबाजी केली आहे. पुर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारने जनतेची घोर निराशा केली, असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, अडचणीच्या काळात आपण पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. दररोज १८ तास काम करत आहे. मी राज्यात लढतो आहे. कार्यकर्त्यांनी तालुका सांभाळावा, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा- उद्धव ठाकरे