पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या'मुळे काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदावर अडून बसली

काँग्रेस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांबरोबर शपथ घेऊन आघाडी सरकार स्थापन केले आहे. परंतु, पडद्यामागे अजूनही अनेक गोष्टी घडत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील हिस्सेदारीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीकडून आता विधानसभा अध्यक्षपदावर दावेदारी केली जात आहे. तर काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे.

GDP आकडे हैराण करणारे, मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली चिंता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दोन-दोन मंत्री आहेत. सुरुवातीला उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीला तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याचबरोबर शिवसेना-राष्ट्रवादीला अनुक्रमे १५-१५ आणि काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळतील असे ठरवण्यात आले. परंतु, काँग्रेस यावर तयार नाही. काँग्रेसला आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने संकटाच्या काळी विधानसभा अध्यक्ष खूप महत्वाचे पद असल्याचे म्हटले. परंतु, विद्यमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. कारण उपमुख्यमंत्री या नात्याने सरकारच्या प्रत्येक निर्णयांमध्ये काँग्रेसची भूमिका असेल. यासाठी पक्षात विधानसभा अध्यक्ष पद राष्ट्रवादीला देण्यात यावे, असा मतप्रवाहही सुरु झाला आहे.

'सेव्ह मेट्रो सेव्ह मुंबई', CM ठाकरेंच्या निर्णयावर फडणवीसांचा नारा

प्रदेश काँग्रेसमधील एका नेत्याने सांगितले की, सरकारी जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र जाते. काँग्रेसचे उपमुख्यमंत्री नसल्यास लोकांमध्ये हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार असल्याचा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारमध्ये आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद महत्त्वाचे आहे. 

CM उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामाला दिली स्थगिती

त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपद सोडण्याच्या बदल्यात काँग्रेसने एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणई केली आहे. काँग्रेसच्या मते या सर्व विषयांवर आघाडीच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु आहे. एक-दोन दिवसांत सर्व गोष्टी स्पष्ट होईल, असेही सांगितले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यासाठी तयार होतील, अशी काँग्रेसला आशा आहे. कारण काँग्रेस आघाडीतील महत्त्वाचा घटक आहे. बहुमत चाचणीनंतर उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याच्या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीलाच मिळाले पाहिजे, असे त्यांना म्हटले. हेच निश्चित झाले होते, हे त्यांनी आवर्जुन सांगितले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच घोषणा केली होती. मुख्यमंत्रिपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रिपद पाच वर्षांसाठी राष्ट्रवादीकडे आणि विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी काँग्रेसकडे राहिल.