पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला 'न्याय' मिळणार का?

काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देणार

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितपणे सत्ता स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरणार आहे. ज्या पदामुळे सत्तास्थापनेचा एवढा मोठा खेळ रंगला ते मुख्यमंत्रीपद 'अंखड' शिवसेनाला मिळणार की राष्ट्रवादी त्यात वाटेकरी असणार? उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस कुणाला पंसती देणार? यासारख्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

'आमचं ठरलंय! सेनेसोबतच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा करायची'

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाप्रमाणे खातेवाटपाचे गणित सोडवण्यात येणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. यात शिवसेना-राष्ट्रवादी यांना प्रत्येकी १५-१५ तर काँग्रेसला १२ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीने ५४ तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. 

असा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला!

तिन्ही पक्षातील काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. कमी जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेस सत्तेमध्ये समसमान वाटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून यासंदर्भात राज्यातील नेत्यांना सूचना मिळाल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकमेकांशिवाय पुढे जाणे कुणालाच शक्य नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाशिवाय काँग्रेसला चांगली खाती मिळण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल. खातेवाटपामध्ये शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणे सम-समान वाटा देऊन त्यांना योग्य मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.