पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेसाठी काँग्रेसची पाचवी यादी जाहीर

काँग्रेसची पाचवी यादी जाहीर

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नांदेड उत्तरमधून मोहनराव हंबरडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुखेडमधून भाऊसाहेब पाटील, पालघरमधून योगेश नाम, भिवंडी पूर्वमधून संतोष शेट्टी, कुडाळमधून चेतन मोंडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री काँग्रेसने १९ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. 

 

मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या

काँग्रेसची पाचवी यादी जाहीर

यापूर्वी काँग्रेसने ५१, ५१, २० आणि १९ अशा टप्प्याने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पाचव्या यादीतील ५ उमेदवारांसह काँग्रेसने आतापर्यंत १४५ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. महत्वाचे म्हणजे, आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने १२५-१२५ जागेवर लढण्याचा फॉर्म्युला निश्चत केला होता. मात्र या फॉर्म्युल्यापेक्षा जास्त उमेदवार काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

पराग शहांच्या गाडीवर प्रकाश मेहतांच्या समर्थकांचा हल्ला