राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना भीती दाखवत भाजपने सत्ता स्थापनेचा खेळ मांडला आहे. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. फडणवीस सरकारने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. मात्र त्यांनी आता त्यांना मंत्रालयात पाठवण्याचा निर्धार केलाय. मोदी है तो मुमकीन है, असे म्हणत त्यांनी भाजपच्या सत्तास्थापनेच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
शिवसेनेने छत्रपतींची भाषा बोलू नये, रविशंकर प्रसाद यांची टीका
स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यघटनेचा अनादर करुन एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांना अंधारात ठेऊन शपथ घेतली, असे ते म्हणाले. सत्तास्थापनेसंदर्भातील काही तांत्रिकबाबीसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यघटनेचे रक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडली नाही. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसाठी काम केले असा आरोपही सुरजेवाला यांनी केला. आमदारांवर बोली लावणे हाच भाजपचा खरा चेहरा आहे. कर्नाटक, उत्तरांचल, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि गोवा यानंतर बाबासाहेबांच्या महाराष्ट्रतही लोकशाहीची अहवेलना करण्यात आली.
'मी काय म्हंटलं होतं क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतो'
सरकार स्थापन करण्याचा दावा कोणी आणि कधी केला?सत्तास्थापनेवेळी भाजपला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी हस्ताक्षर केले ? तासाभरामध्ये राज्यपालांनी त्याची चाचपणी कशी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट संपुष्टात कधी आणली? हा निर्णय घेण्यासाठी कॅबिनेटची बैठक कधी पार पडली? असे अनेक प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.