पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून शरद पवारही बैठकीला हजर

शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते अहमद पटेल देखील उपस्थित आहेत. यापूर्वी शरद पवार यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नाही असे म्हटले होते. मात्र अहमद पटेल यांच्या उपस्थितीमुळे त्यांनीही बैठकीला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. 

सोनिया गांधी 'राजी', काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक निर्णायक ठरणार?

या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत एकत्रित सत्तास्थापनेला मंजूरी दिल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीकडे सत्ता स्थापनेतील निर्णायक बैठक म्हणून पाहिले जात आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र शरद पवार आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीमुळे पुढील निर्णयासाठी यात दोन्ही पक्षामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.  

'उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार'

यापूर्वी शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता. शिवसेनेसोबत एकत्र सरकार स्थापनेसंदर्भात कोणतीही निर्णय झालेली नाही, असे त्यांनी म्हटले होते. याशिवाय त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चेंना उधाण आले. मात्र बैठकीला उपस्थित राहत त्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरळीत सुरु असल्याचे संकेतच दिले आहेत.