पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपपेक्षा शिवसेना बरी, सेनेला पाठिंबा देण्यासाठी दलवाईंचे पत्र

ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई

काँग्रेसचे विचार शिवसेनेपेक्षा वेगळे आहेत मात्र भाजप पेक्षा शिवसेना बरी आहे. त्यामुळे सेनेकडून प्रस्ताव आला तर जरुर पाठिंबा द्यावा अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहलं आहे. 

भाजप पेक्षा शिवसेना बरी आहे.  शिवसेनेचा नेहमीच मराठी माणसाला पाठिंबा राहिला आहे. मराठी माणसांसाठी त्यांच्या समस्या निवारण्यासाठी भांडण्यात मला तरी काहीच गैर वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यास हरकत नसावी असं हुसेन दलवाई एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

शिवसेनेनं अनेकदा काँग्रेसला  पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता, असंही दलवाई म्हणाले. जर उद्धव ठाकरे प्रस्ताव घेऊन आले तर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नक्कीच याचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

'आम्ही विरोधी पक्षात बसावं अशी लोकांची इच्छा'

विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपनं १०५ जागांवर तर शिवसेनेनं ५६ जागांवर विजय मिळवला. युतीचा निवडणुकीत विजय झाला असला तरी  दोन्ही पक्षांचं घोडं हे मुख्यमंत्रीपदासाठी अडलं आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी भाजपला मान्य  नाही. 

सरकारला पूर्वीच कळवलं होतं, हेरगिरी प्रकरणावर व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

तर दुसरीकडे आम्ही शिवसेनेसोबत न जात विरोधी बाकावर बसावं अशी जनतेची इच्छा आहे असं म्हणत शरद पवारांनीही सेनेची कोंडी केली आहे.  काँग्रेस पक्षातही सेनेसोबत जाण्यास अनेक नेत्यांचा नकार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं राजकारण कोणतं वळण घेतंय हे पाहण्यासारखं ठरेन.

शहा राहिले दूर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी फोनवर चर्चा