पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका

राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेस पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधला गेला असून, स्वतःची ओळख विसरून बसला असल्याची टीका पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष, राज्यातील त्याचे नेतृत्त्व यांच्यावर टीका केली.

मुक्ता टिळकांच्या प्रचारपत्रकात लोकमान्य टिळकांचे छायाचित्र नसल्याने आश्चर्य

ते म्हणाले, काँग्रेस स्वतःची ओळख हरवून बसला आहे. ज्यांच्याकडे काँग्रेसने राज्यातील पक्षाची धुरा सोपविली आहे. ते आल्यानंतर सर्वाधिक काँग्रेस नेते पक्ष सोडून गेले आहेत. आता ते तरी पक्षात सुखी राहतील, अशी मला आशा आहे. काँग्रेस दुसऱ्याच्या दावणीला बांधला गेला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाबद्दल सांगत असले, तरी त्यांच्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था काय आहे, हे त्यांनी बघितले पाहिजे. या अधोगतीला जबाबदार कोण आहे, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या सभास्थळी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य

लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप सरकारच्या काळात त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी होती.