पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच जागावाटपात भाजपशी तडजोड - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

राज्यात पुन्हा युतीचे सरकार यावे म्हणून शिवसेनेने जागावाटपात भाजपशी तडजोड केल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. केवळ राज्यातील लोकांचे हित लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी युतीमागील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उपयोग नाही, ओवेसींची टीका

भाजपशी युती करण्यासाठी शिवसेना १३५ जागांची मागणी करीत होता. पण युतीमध्ये अखेर शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये भाजपच्या कोट्यातील दोन जागा शिवसेनेला मिळणार आहेत. त्याचवेळी भाजप राज्यात १५० जागांवर निवडणूक लढवित आहे. १४ जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. अर्थात या ठिकाणी भाजपच्याच चिन्हावर मित्रपक्षातील उमेदवार निवडणूक लढणार आहेत. आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना सर्वांत कमी जागांवर निवडणूक लढवित आहे.

युती करताना आम्ही तडजोड केली आहे. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे विनंती केली. आमची अडचण समजून घ्या, असे त्यांनी मला सांगितले. म्हणूनच मी कमी जागांवर युती करायला तयार झालो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

राज्यात युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर यायला पाहिजे म्हणूनच मी ही तडजोड केली. त्यामध्ये लपविण्यासारखे काहीही नाही. जर युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर ज्या १६४ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी काम करू शकू, असेही त्यांनी सांगितले.

... यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती बघूनच आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, जरी आम्ही कमी जागांवर उमेदवार उभे केले असले, तरी आमच्या जास्त जागा निवडून येतील. नव्या विधानसभेत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असतील. २१ ऑक्टोबरला निवडणुकीनंतर ते दिसून येईलच, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे लगेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणार नाहीत
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवित असले, तरी याचा अर्थ ते लगेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणार, असा काढू नये, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरेंना मंत्रीपद मिळण्यापूर्वी विधीमंडळ कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याला त्यामध्ये रस आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे निवडणूक लढवित आहेत, याचा अर्थ मी राजकारणातून निवृत्त होणार, असा अजिबात काढू नये. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिले आहे. ते पूर्ण करीत नाही. तोपर्यंत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.