पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंसह महाआघाडीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा : भाजप

आशिष शेलार

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर सुटला आहे. अनेक नाट्यमय घटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी स्थापन झालेले भाजप सरकार अल्पमतात असल्याने कोसळले. त्यानंतर मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पंकजा मुंडे, विनोद तावडे, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.   

 

शरद पवार म्हणाले, आज बाळासाहेब हवे होते

या बैठकीनंतर भाजप नेते आणि प्रवक्ते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्रबळ विरोधक म्हणून काम करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, महिला, युवा, वंचित, पीडित सर्वांचे प्रश्न सभागृहात प्रबळतेने मांडण्याबाबतचा ठराव एकमताने मान्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.  

अजित पवार साहेबांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

शिवसेना-काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख काँग्रेस मुख्यमंत्री होणार असल्याचेही समजते आहे. महाराष्ट्र विकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना भावी वाटचालीसाठी भाजपकडून शुभेच्छा! असेही शेलार यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coming days we will serve people sitting in the opposition under devendra fadnavis says BJP Ashish Shelar