पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नितेश राणेंनी भाजपमध्ये केला प्रवेश; उमेदवारीवर झाले शिक्कामोर्तब

नितेश राणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवासांपासून नितेश राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. नितेश राणे यांनी कणकवलीतील भाजप कार्यालयात जाऊन भाजप सदस्यत्वाचा अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

NCPच्या दुसऱ्या यादीत पंकज भुजबळ, बबनदादा शिंदेंसह २० जणांना संधी

अखेर नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या उपस्थितीत नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोणताही गाजावाजा न करता नितेश राणे यांनी भाजपमध्य प्रवेश केला आहे. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच भाजप आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन

दरम्यान, नितेश राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जाहीर केले आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये नितेश राणे यांचे नाव येण्याची शक्यता आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नितेश राणे यांना एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्याठिकाणावरुन भव्य मिरवणूक काढून नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.  

जामिनासाठी चिदंबरम यांची सुप्रीम कोर्टात धाव आणि...