पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप

भाजप

राज्याच्या सामान्य जनतेने महायुतीला जनादेश दिला असून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी माहिती राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत. प्रस्ताव आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करु. शिवसेनेसाठी भाजपचे दरवाजे २४ तास खुले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.    

आमदार फुटण्याची भीती नाही, बाळासाहेब थोरात यांना खात्री

भाजपने विधीमंडळ गटनेता म्हणून एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. भाजपच्या सर्व नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. उल्लेखनिय आहे की, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजप यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भाजपने मुख्यमंत्री पदावर कोणताही समझोता होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर शिवसेना काय काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊः नवाब मलिक

राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र शिवसेना सध्या भाजपची कोंडी करतानाचे चित्र आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचे संकेत मिळाले असले तरी शिवसेनेशिवाय भाजप स्थिर सरकार देऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शिवसेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ, असे विधान केले होते.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: cm devendra fadnavis government in maharashtra bjp wait for shivsena proposal says chandrakant patil